मुक्ताईनगर तालुका खुनाने हादरला : भाऊबंदकीच्या वादातून लालगोटा येथे प्रौढाचा खून
मूर्ती ठेवण्याचा वाद बेतला जीवावर
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, लालगोटा येथे देवीची मूर्ती ठेवण्याच्या वादातून भाऊबंदकीचा वाद उफाळला. आरोपींनी राणा पवार यांच्यावर कुर्हाड, लोखंडी आसारी व रॉडव लाठ्या-काठ्याद्वारे हल्ला करण्यात आल्याने त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला तर अन्य सहा जण जखमी झाले.
हल्ल्यात सहा जण जखमी
आरोपींच्या हल्ल्यात मीनाक्षी राणा पवार, राजकुवर राणा पवार, धनकुमार राणा पवार, सर्जेश सर्जू पवार, सर्जू मनमौजदार पवार, चोनीबाई सर्जू पवार (सर्व रा.लालगोटा, ता.मुक्ताईनगर) जखमी झाले.
12 आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा : पाच अटकेत
राणा पवार यांच्या खून प्रकरणी मयताची पत्नी मीनाक्षी राणा पवार (45) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुदीप जिलीसबाबू पवार, राजेंद्र बाबू सिगरेटबाबू पवार, क्रिश राजेंद्रबाबू पवार, दीपक जिलीसबाबू पवार, जिलीसबाबू कोनानी पवार, शक्ती कपूर सिगरेटबाबू पवार, शिवकपूर शक्तीकपूर पवार, लताबाई शक्तीकपूर पवार, अनुलेखा दीपक पवार व अनोळखी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, रात्री उशिरा पोलिसांनी गुरुदीप जिलीसबाबू पवार, राजेंद्र बाबू सिगरेटबाबू पवार, क्रिश राजेंद्रबाबू पवार,लताबाई शक्तीकपूर पवार व अनुलेखा दीपक पवार यांना अटक केली आहे. तपास पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ करीत आहेत.