फोटो दाखवण्याची धमकी देत रावेर तालुक्यातील विवाहितेवर अत्याचार
Married woman in Raver taluka tortured while threatening to show photos रावेर (20 ऑगस्ट 2025) : रावेर तालुक्यातील एका गावातील 35 वर्षीय विवाहितेवर धमकावून अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल होताच त्यास अटक करण्यात आली.
असे आहे नेमके प्रकरण
रावेर तालुक्यातील एका गावात 35 वर्षीय विवाहिता वास्तव्यास आहेत. संशयीत आरोपी किशोर तायडे याने विवाहितेला तुझे फोटो तुझ्या पतीस व गावातील लोकांना दाखवून तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली तसेच 12 जुलै 2025 पूर्वीच्या दोन वर्षांपासून उटखेडा-विवरा रस्त्यावर एका शेतात अत्याचार केल्याचा आरोप आहे
दरम्यान, पीडीत विवाहितेने जाच असह्य झाल्यानंतर रावेर पोलिसात तक्रार दिल्यानंतर तरुणाविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याला 23 ऑगष्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तपास पोलिस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.