हुंड्यासाठी पत्नीला जिवंत जाळले

Wife burned alive for dowry नोएडा (24 ऑगस्ट 2025) : राज्यात महिलांसह मुलींवर अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाही. अशीच एक अंगावर शहारे आणणारी घटना नोएडात घडली आहे. हुंडा न मिळाल्याने पतीने संतप्त पतीने पत्नीलाच जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. निकी असे मृत विवाहितेचे तर विपीन असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
काय आहे नेमके प्रकरण
पत्नीने कुटुंबाकडून 35 लाख रुपये आणण्यासाठी पती दबाव आणत होता परंतु महिलेने नकार दिला. यानंतर महिलेच्या पतीने आणि तिच्या सासूने तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ती महिला सोडून देण्याची विनंती करत राहिली, पण त्यांनी तिचे ऐकले नाही. पतीने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळून टाकले. महिलेच्या बहिणीने तिला वाचवण्याचा आणि व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी तिलाही मारहाण केली.
व्हिडिओमध्ये ती महिला घाबरलेल्या अवस्थेत पायर्यांवरून खाली पळताना दिसत आहे. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी घटनास्थळी धावले. त्यांनी आगीवर ब्लँकेट टाकले आणि तिला फोर्टिस रुग्णालयात नेले. तिची प्रकृती पाहून डॉक्टरांनी तिला दिल्ली रुग्णालयात रेफर केले.
शुक्रवारी महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि शनिवारी पतीला अटक केली. ही संपूर्ण घटना 21 ऑगस्ट रोजी ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात घडली. त्याचा व्हिडिओ शनिवारी समोर आला.
पतीला अटक, सासू, सासरे आणि मेहुणे पसार
शनिवारी कुटुंबातील सदस्यांनी कसना पोलिस ठाण्यात जाऊन कारवाईची मागणी करत गोंधळ घातला. तक्रारीवरून पोलिसांनी पती विपिन, मेहुणा रोहित, सासू दया आणि सासरे सतवीर यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. एडीसीपी सुधीर कुमार म्हणाले – तक्रारीच्या आधारे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपी पती विपिनला अटक करण्यात आली.