अपघातग्रस्ताला आमदार अमोल जावळे यांनी दिला मदतीचा हात


MLA Amol Javale extended a helping hand to the accident victim यावल (24 ऑगस्ट 2025) : फैजपूर-हंबर्डी मार्गावरील चोरवड येथे रविवारी सकाळी प्रमोद लहानू रजाने यांचा अपघात झाला. अपघातानंतर काही काळ रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असतानाच योगायोगाने या मार्गाने प्रवास करीत असलेले रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे जात असताना त्यांनी अपघातग्रस्ताला मदतीचा हात दिला.

यावेळी आमदार जावळे यांनी पुढाकार घेत रजाने यांना गाडीत घेतले आणि थेट फैजपूर येथील रुग्णालयात दाखल केले. रुग्णाला त्वरित वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी आमदार जावळे यांनी डॉक्टरांशी संवाद साधून आवश्यक ती सर्व चौकशीही केली.




अचानक घडलेल्या या प्रसंगात आमदार अमोल जावळे यांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता माणुसकीचे दर्शन घडवणारी आहे.

 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !