मोहाडी पोलिसांची दमदार कामगिरी : साधूच्या वेशातील दरोडेखोर जाळ्यात


Strong performance by Mohadi police : Robbers disguised as sadhus caught धुळे (25 ऑगस्ट 2025)  : धुळ्यातील मोहाडी पोलिसांनी साधूच्या वेशातील दरोडेखोरांच्या टोळीला अटक केली आहे. पाचही आरोपींनी प्रवाशांना रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत लूट केल्याने ही कारवाई करण्यात आली.

काय घडले धुळ्यात
तक्रारदारललिता नरेंद्र पाटील (28, रा.खाचणे, ता.चोपडा, जि.जळगाव) या 21 रोजी नातलगांसह पंढरपूर, तुळजापूर व जेजुरी येथे देवदर्शन करून परतत अतसताना क्रूझर गाडी (एम.एच.18 जे.9563) ही लळींग घाट परिसरात आल्यानंतर साधूचा वेष धारण केलेल्या भामट्याने गाडी समोर येत ‘मुझे पिनेके लिये पाणी दो, और गाडीसे उतरकर मेरा आशिर्वाद लो’ म्हणत सर्व प्रवाशांना गाडीतून उतरवले. प्रवाशांनी साधूचा सन्मान करीत पाय धरले मात्र याचवेळी साधूने कमरेला चाकू बाहेर काढला व ‘आप के पास का सोना जल्दी निकालके दो, नहीं तो जान से मार दूंगा’ अशी धमकी देत प्रवाशांना धाक दाखवला. तक्रारदाराच्या आई सुनंदाबाई व चुलत सासू सरलाबाई यांच्याकडील दागिने हिसकावून घेण्यात आले.




या दागिण्यांची केली लूट
आरोपींनी सात ग्रॅम सोन्याची मणी व रामपानाची माळ, तीन ग्रॅम सोन्याचे कानातील टॉप्स, पाच ग्रॅम सोन्याची मणीमाळ असा एकूण एक लाख पाच हजारांचा ऐवज लूटला. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

साधूच्या वेशातील दरोडेखोरांना बेड्या
पोलिसांनी अवघ्या काही तासात तपासचक्र फिरवत सोमवार, 25 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता गरताडबारी परिसरातून संशयित  जागीरनाथ बाबुनाथ नाथसफेरे (23, रा.घेसुपुरा सफेरा बस्ती, ता. रोशनाबाद, जि. हरिद्वार, उत्तराखंड) याच्या मुसक्या बांधल्यानंतर त्यानेी गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावेही सांगितल्यानंतर आरोपी नावे
जागीरनाथ बाबुनाथ नाथसफेरे (23), गोविंदनाथ कल्लूनाथ नाथसफेरे (35), सौदागर बाबुनाथ नाथसफेरे (25), विक्की मोसमनाथ नाथसफेरे (23), क्रांता मोसमनाथ नाथसफेरे (25) (सर्व रा.घेसुपुरा सफेरा बस्ती, ता. रोशनाबाद, जि. हरिद्वार, उत्तराखंड) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी आणखी काहींची लूट केल्याची शक्यता आहे.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलिस ठाण्याच्या डॅशिंग पोलिस निरीक्षक शिल्पा गोपीचंद पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक  मोहन पाटील, हवालदार पंकज चव्हाण, मुकेश मोरे, प्रकाश जाधव, रमेश शिंदे व मनिष सोनगिरे यांच्या पथकाने केली. तपास पोलिस उपनिरीक्षक मोहन पाटील करीत आहेत.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !