रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई : प्रवाशांच्या वस्तू लांबवणार्या 16 भामट्यांना अटक
1.80 लाखांचा ऐवज जप्त ः कारवाईने चोरटे हादरले
Major action by Railway Protection Force: 16 thugs arrested for delaying passengers’ belongings भुसावळ (25 ऑगस्ट 2025) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन यात्रि सुरक्षा अंतर्गत रेल्वे सुरक्षा बल व जीआरपी यांनी संयुक्तरित्या केलेल्या विशेष गस्त आणि तपास कार्यवाहीत एकूण 16 संशयीतांना अटक केली. या दरम्यान सुमारे एक लाख 80 हजार रूपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले. ही संपूर्ण मोहीम रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात आली.
या भागात झाली कारवाई
रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिस यांची संयुक्त विशेष मोहिम रेल्वे स्थानक व धावत्या गाड्यांमध्ये राबविण्यात आली. ही मोहिम खंडवा ते
भुसावळ, बडनेरा ते नाशिक रोड या दरम्यान होती.
कारवाईचा आढावा
नाशिक रोड स्टेशन: दोन संशयीत मोबाईल विकताना अटक, यात आरपीएफ पथकाने 19 रोजी 11 हजार रूपयांचा तर 60 हजार रूपये किंमतीचा किंमतीचा चोरीचा मोबाईल प्रकरणी 20 व 21 ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या प्रकरणांत 5 संशयीतांची टोळीच्या मुसक्या आवळल्यात. आरपीएफ, जीआरपी पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई केली.
मलकापूर स्टेशनवर सादिक शाह या संशयीतांकडून 75 हजार 900 रूपये किंमतीचे लॅपटॉप .जप्त केले. त्याच्यावर यापूर्वी सुध्दा दोन गुन्हे नोंद आहे, याच्यागडून एकूण चोरीस गेलेले मालमत्ता 1 लाख 60 हजारापेक्षा जास्त होती. दरम्यान, मनमाड स्टेशनवर तीन संशयितांना ताब्यात घेऊन, चोरीच्या उद्देशाने फिरत असताना त्यांना जीआरपी पोलिसांकडे सुपूर्द केले.
भुसावळ, बर्हाणपूरला कारवाई
भुसावळ-बुरहानपूरला कारवाई, मोहम्मद फैजान अन्सारी या संशयीताकडून 13 हजार रूपयांचा मोबाईल व 3 हजार 500 रूपये रोख असा 16 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
असा केला मुद्देमाल जप्त
एकूण 16 संशयीत अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख 80 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले, 10 पेक्षा जास्त गुन्ह्यांची यातून उकल झाली. ही कारवाई संबंधित आरपीएफ व जीआरपी ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी केली. वरिष्ठ सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त प्रयत्नातून कारवाई करण्यात आली.