पतीचा जाच असह्य : वरणगावात विवाहितेची आत्महत्या
Husband’s persecution unbearable : Married woman commits suicide in Varangaon वरणगाव (25 ऑगस्ट 2025) : वरणगावातील भंगाळेवाडा परिसरातील 35 वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.
योगीता धीरज भंगाळे (35) असे मृत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, मृताच्या वडिलांनी मुलीचा छळ केला जात असल्याची तक्रार दिल्यानंतर पती धीरज भंगाळेविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
विवाहितेने छळापुढे हात टेकत उचलले टोकाचे पाऊल
मृत विवाहितेचे वडील रामकृष्ण कराडे (60, काहुलखेडा, ता.भुसावळ) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, मृत योगीताचा 15 वर्षांपूर्वी विवाह धीरज भंगाळे सोबत झाला होता. विवाहानंतर पती धीरज भंगाळे शारिरिक मानसिक त्रास देता होता. योगीताला दोन अपत्ये असून ती अलीकडेच काहूरखेडा येथे माहेरी आल्यानंतर तिने इलेक्ट्रिक चुल, टीव्ही व वॉशिंग मशीन मागितले होते.
17 ऑगस्ट रोजी विवाहितेला वडिलांनी माहेरी सोडले मात्र 20 ऑगस्टला संध्याकाळी योगिताने वडिलांना फोन करून पती छळ करतो, अशी तक्रार केली व दुसर्या दिवशीच 21 ऑगस्टला सकाळी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.