मुक्ताईनगर विभागाच्या पोलिस उपअधीक्षकपदी सुभाष ढवळे
गणेश वाघ
Subhash Dhawale appointed as Deputy Superintendent of Police of Muktai Nagar Division भुसावळ (26 ऑगस्ट 2025) : मुक्ताईनगर विभागाला अखेर पोलिस उपअधीक्षक लाभले आहेत. काही दिवसांपूर्वीच बी.जी.रोहोम यांची मुक्ताईनगर पोलिस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आल्यानंतर त्यांची पुन्हा पाचोरा विभागाच्या पोलिस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आल्याने हे पद रिक्त होते मात्र राज्य शासनाने 17 पोलिस निरीक्षकांना पोलिस उपअधीक्षकपदी पदोन्नती दिल्यानंतर सुभाष मुरलीधर ढवळे यांच्याकडे मुक्ताईनगरची धूरा देण्यात आली आहे.
राज्यात 17 निरीक्षकांना पदोन्नती
राज्य शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी राज्यातील 17 पोलिस निरीक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्याबाबत आदेश निर्गमीत केला आहे. त्यात मुक्ताईनगर विभागाच्या पोलिस उपअधीक्षक सुभाष ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पाच पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या
7 ऑगस्ट रोजी पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या मात्र त्यात अंशतः काही बदल करण्यात आला असून त्यानुसार काही अधिकार्यांना नव्याने बदलीचे ठिकाण देण्यात आले आहे.