कोथळीच्या आयआयटी इंजिनिअर आत्महत्या

युपीच्या कानपूरातील घटना :  मुक्ताईनगर तालुक्यात शोककळा


IIT engineer from Kothali commits suicide मुक्ताईनगर (27 ऑगस्ट 2025) : मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील रहिवासी व आयआयटीत इंजिनिअर असलेल्या तरुणाने कानपूरात आत्महत्या केली. ही घटना मंगळवार. 26 रोजी घडली. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली. दीपक शिरीष चौधरी (25) असे मयताचे नाव आहे.

काय घडले नेमके तरुणासोबत?
कोथळी येथे दीपकचा परिवार वास्तव्यास असून तो सध्या दीपनगर येथे वास्तव्याला होता. नुकताच तो आयआयटी इंजिनिअरची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याला कानपूर येथील एका नामांकित कंपनीत नोकरी मिळाली. काही दिवसांपूर्वीच तो नोकरीवर रुजू झाला मात्र कानपूर येथील त्याच्या निवासस्थानी मंगळवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पार्थिवाचे कानपूरहून रुग्णवाहिकेने कोथळी येथे आणण्यात आले.




बुधवार, 27 ऑगस्ट रोजी सकाळी त्याचे पार्थिव गावात पोहोचले. दीपकचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरुणाने आत्महत्या का केली ? याचे कारण समोर आले नाही.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !