बोरावल खुर्दला बांधकाम वादातून एकास चौघांची मारहाण

Four people beaten up in Borawal Khurd over construction dispute यावल (28 ऑगस्ट 2025) : यावल तालुक्यातील बोरावल खुर्द गावात बांधकामाच्या जागेवरून वाद होवून चार जणांना चार जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली व विट फेकून मारून दुखापत केली. ही घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी यावल पोलिसात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले बोरावद खुर्दमध्ये ?
बोरावल खुर्द, ता.यावल या गावात बांधकामाच्या जागेवरून वाद झाला. या वादातून नितीन रवींद्र मोरे, रवींद्र रामदास मोरे, मुकेश रवींद्र मोरे व मनोज रवींद्र मोरे या चार जणांना अशोक भावरत मोरे, कैलास भावरत मोरे, रमेश भावरत मोरे व चेतन कैलास मोरे या चार जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली. वीट फेकून मारून दुखापत केली तसेच लाकडी पाटीने डोक्यात मारून दुखापत केली.