भुसावळातील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश स्कूलमध्ये ‘बाप्पा’ विराजमान

‘Bappa’ sits at Dr. Ulhas Patil English School in Bhusawal भुसावळ (28 ऑगस्ट 2025) :शहरातील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जय घोषात लेझीम व ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले. विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला. शाळेच्या परिसरात त्यामुळे मंगलमय वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पा मोरया तालावर नृत्य सादर केले. शाळेतील शिक्षकांनी स्वतः गणपती बनविणे कार्यशाळेत पर्यावरण पूरक मूर्ती बनविली.
शिक्षकांनी बनविलेल्या पूरक शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. मुख्याध्यापिका अनघा पाटील यांच्याहस्ते गणपती स्थापना, पूजा करण्यात आली. प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आगमनावेळी केलेली गणपती मंदिराची रोषणाई व शिक्षकांनी स्वतः बनवलेले पर्यावरण पूरक डेकोरेशन उपस्थिताचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.