किनगावकरांकडून ‘नायजेरिया’त श्रींची स्थापना

अकरा दिवसाचा उत्सव साजरा करणार !


Establishment of Sri in ‘Nigeria’ by Kingaonkar यावल (28 ऑगस्ट 2025) : यावल तालुक्यातील किनगाव येथील वारे-पाटील कुटुंब हे गेल्या कित्येक वर्षांपासून नायजेरिया या देशातील सांगो ओटा राज्यातील लागोस शहरात स्थित झाले आहेत. तेथे ते विपी इंडस्ट्रीजमध्ये नोकरीला असून त्यांनी तेथे एक भारतीय ग्रुप तयार केला आहे आणि या ग्रुपच्या माध्यमातून तेथे त्यांनी मोठ्या उत्साहात श्रीची विधीवत स्थापना केली.

गणेशोत्सवाचे 21 वे वर्ष
यंदाचे तेथील गणेशोत्सवाचे हे 21 वे वर्ष असून विदेशात राहताना भारतीय संस्कृती जोपासली गेली पाहिजे या उद्देशातून येथे ते अकरा दिवसाचा गणेशोत्सव साजरा करीत आहेत.




किनगाव, ता.यावल येथील रहिवासी ज्ञानेश्वर भागवत वारे-पाटील हे गेल्या कित्येक वर्षापासून वीपी इंडस्ट्रीज लिमिटेड या नायजेरिया देशातील सांगो ओटा राज्यातील लागोस शहरात वास्तव्यास आहेत. विदेशात काम करत असतांना त्यांनी व त्याच्या प्लांट हेड देबेंदू दास याच्या सहकार्‍याने एक भारतीय ग्रुप तयार केला आहे. आणि या ग्रुपच्या माध्यमातून ते तेथे भारतीय विविध सण उत्सव, साजरे करतात. यंदा देखील तेथे गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

ज्ञानेश्वर वारे -पाटील व त्यांच्या पत्नी शीतल वारे- पाटील यांच्या हस्ते त्यांच्या मुख्य कॉलनीत त्यांनी श्री ची स्थापना केली. यंदा हे 21 वे वर्ष असून या उत्सवात बापू घाटे, सुंदर यादव, शितल पटेल, अनिल शर्मा, अनुपम परमार, ब्रिजमोहन जय हिंद, नवीन पाटील आणि संजय पाटील हे त्यांचे मित्र सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात या ठिकाणी त्यांनी श्रीची स्थापना केली आहे. 11 दिवस विविध उपक्रम या गणेशोत्सवात ते राबवणार आहेत. या गणेशोत्सवात भारतीय परंपरा आणि भारतातील विविध राज्यांमधील नागरिकांचा पहेराव तसेच पाक कला, भारतीय सण उत्सवातील विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम ते तेथे 11 दिवसात घेण्यात आहेत. मोठ्या उत्साहात नायजेरिया देशात गणेश उत्सवाला सुरुवात करण्यात आली असून तेथील भारतीय कुटुंबांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !