पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आईचा अपमान निंदनीय : शिशिर जावळे
राहुल गांधींवर तत्काळ कारवाई करण्याची अमित शहांकडे मागणी

Insulting Prime Minister Narendra Modi’s mother is condemnable: Shishir Javale भुसावळ (28 ऑगस्ट 2025) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडील सभेत केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचा उल्लेख करून केलेले विधान प्रचंड वादग्रस्त ठरले आहे. विधानात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मातोश्रींचा उल्लेख करून केलेला अपमान देशभरातून तीव्र निंदा निषेध व्यक्त केला जात आहे.
त्या विधानाचा भुसावळात निषेध
भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव शिशिर दिनकर जावळे यांनीही या विधानाचा कठोर शब्दांत निषेध केला. ते म्हणाले, राजकारणात टीका असावी पण ती फक्त राजकीय मर्यादेतच व्हावी. पंतप्रधानांच्या मातोश्रींचा अपमान हा भारतीय संस्कृती व परंपरेचा अपमान आहे.
राजकीय भाष्य करताना प्रतिस्पर्ध्यांवर टीका करणे साहजिक मानले जाते, परंतु कुटुंबीयांचा अपमान केल्याने सभ्यता आणि भारतीय संस्कृतीला धक्का पोहोचला आहे.राहुल गांधी प्रत्येक वेळी जाणून-बुजून स्वतःला प्रसिद्धी मिळण्यासाठी हिंदू सनातन धर्माविरुद्ध हिंदू विचारांच्या पक्ष आणि नेत्यांबद्दल त्यांच्या कुटुंबियांबद्दल सातत्याने अपमानास्पद आणि निंदनीय भडकाऊ व्यक्तव्य करून ज्ञान त्या प्रकारे प्रसिद्धी मिळवीत असतात. वारंवार याबाबत त्यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत मात्र तरीसुद्धा त्यांची मुजोरी अजूनही थांबलेली नाही सातत्याने ते विवादास्पद अशी वक्तव्य करून स्वतःला प्रसिद्ध मिळवून घेण्यासाठी अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करून देशामध्ये शांततेचा भंग करीत असल्याचा आरोप शिशिर जावळे यांनी केला असून. त्यांच्यावर तत्काळ मोठी कारवाई करावी अशी मागणी शिशिर जावळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्र पाठवून केलेली असल्याचं त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविलेले आहे. राहुल गांधींना आईचे महत्व काय असतं आईचा सन्मान कसा करावा यासाठी त्यांना एक पत्र पाठवणार असल्याचे जावळे यांनी कळविले आहे.