भुसावळ शहर पोलिसांची कारवाई : कंडारीतील महिलेकडून गांजा जप्त


Bhusawal city police action: Ganja seized from a woman in Kandari भुसावळ (28 ऑगस्ट 2025) : भुसावळ शहर पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत कंडारी येथील एका महिलेच्या ताब्यातून 69 ग्रॅम गांजा आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, 25 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता कडारी प्लॉट परिसरात ही कारवाई करण्यात आली. संशयीत फरजाना खान अब्दुल खान यामहिलेच्या घराचे बाहेर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये गांजाची साठवणूक करून विक्रीसाठी ठेवली असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर तपास करण्यात आला. तपासादरम्यान हिरवट रंगाची पाने, फुले, मोकळ्या काड्या असे एकूण 69 ग्रॅम वजनाचे गांजा शेंडे मिळाले. मुद्देमालासह संशयीत महिलेच्या ताब्यातून एक हजार 400 रुपयांच्या किंमतीचा गांजा व 720 रुपयांची रोख रक्कम असा एकूण माल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक शालिनी वलके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल भंडारे हे करीत आहे.




 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !