यावलमध्ये 1 सप्टेंबरपासून श्रीमद् भागवत कथा सप्ताहाला प्रारंभ

Shrimad Bhagwat Katha Week भुसावळ (29 ऑगस्ट 2025) : यावल शहरातील विविध मंदिरांमध्ये 1 सप्टेंबरपासून श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी अध्यात्मिक पर्व ठरणार्या या आयोजनामध्ये विविध ठिकाणी मान्यवर कथाकार कथा वाचन करणार आहेत.
श्री दत्त मंदिरात शाम शास्त्री नाईक, रेणुका देवी मंदिरात विनोद महाराज बयाणी, महाजन गल्लीतील विठ्ठल मंदिरात मोरेश्वर महाराज बयाणी, कोंहळेश्वर राम मंदिरात अतुल महाराज बाविसे तर श्री लक्ष्मीनारायण मंदिरात श्रीकांत महाराज सराफ भागवत कथा वाचणार आहेत.
कथा वाचनाचे वेळापत्रक सकाळी 8 ते दुपारी 12 एवढ्यात संस्कृत वाचन आणि दुपारी 2.30 ते सायं. 6 या मराठीमध्ये निरूपण केले जाणार आहे.सप्ताहाची समाप्ती 7 सप्टेंबर रोजी होणार असून त्यानंतर 8 सप्टेंबर रोजी गीता वाचन आयोजित करण्यात आले आहे.
दरम्यान, रविवार 31 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता गोकर्ण वाचन कथा वाचन होणार आहे. भाविकांनी या अध्यात्मिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापन समितीकडून करण्यात आले आहे.