महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये महिला प्रवाशाचा विनयभंग


जळगाव (29 ऑगस्ट 2025) : रेल्वे प्रवासात महिला प्रवाशाचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. ही धक्कादायक घटना शेगाव ते जळगाव प्रवासादरम्यान घडली. याप्रकरणी शिंदखेडा तालुक्यातील तिघांना अटक करण्यात आली. भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा गुन्हा शून्य क्रमांकाने शेगाव लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

संशयितांपैकी दोन अल्पवयीन (17 वर्षीय) आहेत. इतर तिघांची नावे अनुक्रमे युवराज हिंमत पवार (22), प्रवीण मधुकर पवार (22), नरेंद्र संतोष पवार (22, रा. दराणे, ता.शिंदखेडा, जि. धुळे) अशी आहेत.




काय घडले महिला प्रवाशासोबत ?
गर्दीचा गैरफायदा घेत जनरल डब्यात काही तरुणांनी प्रवाशांना विशेषतः महिलांना त्रास दिला. वरणगाव स्थानकावर गाडी थांबल्यावर एका संशयिताने ट्रॅकवर उतरून अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !