यावल शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत


The terror of stray dogs in Yaval city यावल (30 ऑगस्ट 2025) : शहरातील भगवा चौक, वाणी गल्ली, बालसंस्कार शाळेजवळ गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. दिवसा किंवा रात्री या भागातून जाणार्‍या नागरिकांना कुत्र्यांच्या टोळक्यांचा सामना करावा लागतो.

विशेषतः शाळकरी मुलांना शाळेत ये-जा करतांना भीती निर्माण होत आहे. अनेक वेळा कुत्र्यांच्या भांडणामुळे रस्त्यावर गोंधळ उडतो व त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते.स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांना खेळायला बाहेर सोडताना आता भीती वाटते. कुत्र्यांचे टोळके अचानक समोर आले की मोठेही घाबरून जातात.

परिसरातील नागरिक आता एकच मागणी करत आहेत की, या वाढत्या कुत्र्यांच्या दहशतीवर काहीतरी उपाय नक्की व्हावा, अन्यथा मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !