रावेर तालुका खुनाने हादरला : निंभोर्‍यात कुर्‍हाडीचे घाव घालत पतीलाच संपवले

आरोपी पत्नीला निंभोरा पोलिसांकडून बेड्या ; शनिवारी रात्रीची घटना


Raver taluka shaken by murder : Husband killed with axe in Nimbhora निंभोरा, ता.रावेर (31 ऑगस्ट 2025) : दाम्पत्यात रोज होणार्‍या वादातून पत्नीनेच पतीला कुर्‍हाडीचे घाव घालून संपवल्याची घटना निंभोरा, ता.रावेर येथे शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने रावेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. हुसेन रसूल तडवी (62) असे खून झालेल्या पतीचे तर फर्जाबाई हुसेन तडवी (55) असे अटकेतील आरोपी पत्नीचे नाव आहे.

काय घडले निंभोर्‍यात ?
हुसेन रसूल तडवी (62) हे पत्नी फर्जाबाई हुसेन तडवी (55) सोबत निंभोर्‍यात वास्तव्याला होते. या दाम्पत्याला दोन मुले व तीन मुली असा परिवार आहे मात्र दाम्पत्यात सातत्याने वाद होत असल्याने शनिवारी पुन्हा याच वादातून संशयीत आरोपी फर्जाबाईने कुर्‍हाडीने हुसेन तडवी यांच्यावर वार केले व त्यांचा मृत्यू झाला.

निंभोरा पोलिसांची धाव
खुनाची माहिती मिळताच शनिवारी रात्री दहा वाजेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी पत्नी फर्जाबाईला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी निंभोरा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !