महात्मा गांधी तंटामुक्ती कार्यालयाचे चिनावलला उद्घाटन
गावातील वाद गावातच मिटणार : सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील
Mahatma Gandhi Tantamukti Office inaugurated in Chinavalla चिनावल, ता.रावेर (1 सप्टेंबर 2025) : गावातील तंटे गावातच मिटावेत या उद्देशाने रावेर तालुक्यातील चिनावल येथील ग्रामपंचायत सदस्य व महात्मा गांधी तंटामुक्ती सदस्यांनी रविवार, 31 रोजी सकाळी 10.30 वाजता चिनावल गावात महात्मा गांधी तंटामुक्ती कार्यालय सुरू केले. या कार्यालयाचे उद्घाटन सावदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
चिनावल गावच्या लोकनियुक्त सरपंच ज्योती संजय भालेराव अध्यक्षस्थानी होत्या. चिनावल ग्रामपंचायत ही सावदा पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या 32 गावांपैकी महात्मा गांधी तंटामुक्तीचे स्वतंत्र कार्यालय असणारी पहिली ग्रामपंचायत आहे.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमावेळी चिनावल महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष जितेंद्र नेमाडे, पोलीस पाटील निलेश नेमाडे, तनुजा श्रीकांत सरोदे, जि.प.च्या माजी सदस्य पुष्पा तायडे, शाहीनबी शेख जाबीर, भावना योगेश बोरोले, सुरेखा पाटील, माधुरी नेमाडे, गोपाळ नेमाडे, चंद्रकांत भंगाळे, योगेश बोरोले, उज्वला भंगाळे, सुरेश गारसे, दामोदर महाजन, , ठकसेन पाटील, दीपक बंडु कोळी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच गावातील सर्व गणेश मंडळ, दुर्गोत्सव मंडळाचे पदाधिकारी व गावातील नागरीक उपस्थित हातेेे.
तर यंत्रणेवरील ताणही होईल कमी
सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील म्हणाले की, ग्रामपंचायतीने पुढाकार घेत गावातच सुरू केलेल्या कार्यालयाने निश्चितपणे गावातील वाद गावातच यापुढे मिटणार आहेत त्यामुळे यंत्रणेवरीही ताण काहीसा कमी होणार आहे. गावातील छोट्या-छोट्या वादांचे निराकरण या कार्यालयात होईल, असेही त्यांनी सांगत महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जितेंद्र नेमाडे यांचे अभिनंदन केले.
पोलिस उपनिरीक्षक राहुल सानप, विनोद पाटील, सुनील जोशी, मझहर पठाण, निलेश बाविस्कर, राजेश बोदडे, मयुर पाटील, राहुल येवले आदींची उपस्थिती होती.




