साकळीजवळ क्रुझर-दुचाकीचा अपघात : यावलचा तरुण ठार
Cruiser-two-wheeler accident near Sakli : Yaval youth killed यावल (1 सप्टेंबर 2025) : भरधाव क्रुझर व दुचाकीत धडक होवून या अपघातात यावल शहरातील दुचाकीस्वार जागीच ठार झाला.हा अपघात यावल तालुक्यातील साकळी गावाजवळून चुंचाळे फाट्याकडे जाणार्या रस्त्यावरील वळणावरील भारत तोलकाट्यासमोर सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. मोहित रवींद्र कुवर (22, रा.धनगर वाडा, यावल) असे मयत तरुणाचे नाव ाहे.
काय घडले तरुणासोबत ?
साकळी गावाकडून चुंचाळेकडे जाणार्या फाट्याजवळ अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर वळण असून जवळच भारत तोल काटा आहे. या भारत तोलकाट्यासमोरून दुचाकी (क्रमांक एम. एच.19 एक्स. 1744) द्वारे मोहित रवींद्र कुवर (22, रा.धनगर वाडा, यावल) हा तरुण जळगाव येथून कंपनीतून कामावरून घरी परत येत असताना त्याचवेळी यावलकडून क्रुझर चारचाकी (क्रमांक एम.एच. 19 बी. यु. 2129) घेवून प्रवीण सुनील पाटील (रा.किनगाव) हा चोपड्याकडे जात असताना या वाहनांचा भारत तोलकाट्यासमोर अपघात घडला. या अपघातात 22 वर्षीय मोहित कुवर हा तरुण जागीच ठार झाला.
क्रुझर वाहन चालकाविरोधात गुन्हा
अपघतानंतर क्रुझर वाहन चालकाने जखमी दुचाकीस्वाराला वाहनात घेऊन यावल ग्रामीण रुग्णालयात आणले मात्र डॉक्टरांनी रुग्णालयात मोहित कुवर यास तपासणी करून मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिसात रूपेश कुवर यांच्या फिर्यादीवरून वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रोहिल गणेश करीत आहे.




