साक्रीतील जुगारी पोेलिसांच्या जाळ्यात
साक्री- नगरपंचायतीच्या मागील बोळीत टपरीआड मिलन सट्टा सुरू असताना पोलिसांनी धाड टाकत एका जुगार्याच्या मुसक्या आवळल्या दिलीप वसंत पाठक (रा. साक्री) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पांढर्या रंगाचा आकडे लिहिलेला कागद, 34 हजार 500 रुपये रोख, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चेतन गोसावी यांनी फिर्याद दिली.