डीवायएसपी अंजना कृष्णा यांची कारवाई योग्यच : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती
DYSP Anjana Krishna’s action is correct: Information from District Collector Kumar Ashirwad सोलापूर (9 सप्टेंबर 2025) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेकायदेशीर मुरूम उत्खनन रोखण्याचे निर्देश दिल्यानंतर कर्तव्यात मागे न हटता डीवायएसपी अंजना कृष्णा यांनी कारवाई करीत संबंधिताविरोधात गुन्हे दाखल केले होते. ही कारवाई योग्य असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले आहे. बेकायदा उत्खनन करणार्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आधीच दिल्या असून सविस्तर अहवाल तहसीलदारांना सादर करण्यास सांगितल्याची माहिती त्यांनी सोमवारी माध्यमांना दिली.
काय आहे नेमके प्रकरण ?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोन प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या या उत्खननाबाबत महसूल प्रशासनाने स्पष्ट केले की, संबंधित काम बेकायदेशीर असल्याने कारवाई थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.





