पोटच्या मुलीवर जन्मदात्या पित्याचा अत्याचार


Birth father’s abuse of his daughter नाशिक (10 सप्टेंबर 2025) : बाप-बेटीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नाशिकमधून समोर आली आहे. पित्यानेच अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार करत तिला गर्भवती केले. सोनोग्राफीनंतर उजेडात आलेल्या या गैरकृत्याचा गंगापूर पोलिसांनी छडा लावला. डीएनए नमुन्यांची चाचणी अहवालावरून पोलिसांनी आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या.

तपासणीअंती धक्कादायक बाब उघड
एका परप्रांतीय कुटुंबातील सतरा वर्षीय मुलीला महिनाभरापूर्वी डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने सातपूरच्या कामगार विमा रुग्णालयात उपचारासाठी तिच्या आईने दाखल केले होते. तिथे तपासणी केल्यानंतर पोटदुखी व पोट स्वच्छ होत नसल्याची तक्रार पीडितेने सांगितली. यामुळे डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता ती मुलगी सात आठवड्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले त्यामुळे तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली.






पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल होत पीडित मुलगी व तिच्या आईसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र या मायलेकींसह तिच्या वडिलांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पोलिसांनी दोन पथके तयार करुन तपास सुरू केला. पथकांनी पीडित मुलीच्या गर्भाचे डीएनए नमुने गोळा करत तपासणीला पाठवून दिले.

मात्र पोलिसांनी डीएनए नमुने घेतल्याचे कळल्यापासूनच मुलीचा बाप पसार झाला. त्याने त्याचा मोबाइल हा घरीच ठेवून पळ काढला. त्यामुळे त्याचे लोकेशन शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले होते मात्र पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपास करत सीबीएस भागातून आरोपी पित्याला ताब्यात घेतले.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !