कोतवालांना मिळावा चतुर्थ श्रेणीचा दर्जा : राज्यात कामबंद आंदोलन

Kotwals should be given fourth class status: Work stoppage movement in the state भुसावळ (12 सप्टेंबर 2025) : महसूल विभागातील महसूल सेवक (कोतवाल) यांना ब्रिटिश काळापासून प्रलंबित असलेला चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसाठी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. महसूल मंत्री महसूल चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्षेत्रातील क्रीडा संकुल, कोराडी येथे विदर्भ कोतवाल संघटना व महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने चंद्रशेखर या मागणीसाठी शुक्रवार, 12 पासून कामबंद धरणे आंदोलन व साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्हा पूर्ण ताकदीने या आंदोलनात सहभागी झाला आहे.
जिल्ह्यातील 490 महसूल सेवक सहभाग
जळगाव जिल्ह्यातील एकूण 490 महसूल सेवक (कोतवाल) हे या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आजपासून टप्प्याटप्प्याने उपोषणात कोतवाल त्यात सहभागी होणार आहेत.

यांची होती उपस्थिती
जळगाव जिल्हा महसूल सेवक (कोतवाल) संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष प्रवीण चिखलकर, राज्य कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ.दिलीप साळवे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरसे, लिलाधर भालेराव, विनोद इंगळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महसूल विभाग हा तर शासनाचा कणा ः जितेश चौधरी
महसूल विभाग हा शासनाचा कणा असून त्यातील उपेक्षित घटक अवर्गीकृत कर्मचारी महसूल सेवक (कोतवाल) अनेक वर्षांपासून चतुर्थ श्रेणी दर्जासाठी मागणी करीत आहेत परंतु शासनाकडून वारंवार आश्वासने देऊनही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. शासन जोपर्यंत कोतवाल कर्मचारी यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा जळगाव जिल्हाध्यक्ष जितेश चौधरी यांनी दिला आहे.
