इन्स्टाग्रामवरील बनावट खात्याद्वारे रावेर तालुक्यातील महिलांची बदनामी : अकोल्यातील आरोपीला बेड्या


Defamation of women in Raver taluka through fake account on Instagram : Accused from Akola arrested सावदा (12 सप्टेंबर 2025) : रावेर तालुक्यातील एका गावातील महिलांच्या छायाचित्रांचा वापर करीत त्यापुढे एका गावातील पुरूषांचे छायाचित्र लावून सोशल मिडीयावर अश्लील कमेंट टाकून बदनामी करण्यात आल्याचा प्रकार अलीकडेच समोर आला होता. याप्रकरणी अज्ञाताविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासाअंती शुध्दोधन मोहन सिरसाठ (26, न्यु भीमनगर, शिवणी, ता.जि.अकोला) यास बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला न्यायालयाने 13 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अश्लील मजकूर टाकून बदनामी
तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, तिच्यासह इतर महिलांचे वैयक्तिक फोटो खाजगीपणे वापरून, त्याचबरोबर एका गावातील काही पुरुषांचे फोटो त्यास जोडण्यात आले व अश्लील व मानहानीकारक कमेंट्स सोशल मीडियावर करण्यात आल्या. हे सर्व फोटो व मजकूर बनावट इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आले. आल्या.


मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ तसेच सावद्याचे सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील व सहकार्‍यांनी आरोपीचा तांत्रिक कौशल्याचा वापर करीत शोध घेत त्यास अटक केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !