हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन : काल्या सोनवणेला जळगावात बेड्या


Deported accused caught in Jalgaon : Shanipeth police take action जळगाव (12 सप्टेंबर 2025) : गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे दोन वर्षांसाठी जळगाव शहरातून हद्दपार करण्यात आलेला संशयीत पुन्हा शहरात आल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी कारवाई करीत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. गणेश उर्फ काल्या रवींद्र सोनवणे (27, रा. कांचननगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शनीपेठच्या डॅशिंग पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना गणेश सोनवणे शहरात परतल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार मंगळवारी, 9 सप्टेंबर रोजी पहाटे ही कारवाई करण्यात आली.


गुप्त माहिती आणि यशस्वी सापळा
गणेश उर्फ काल्या सोनवणे हा कांचननगर परिसरातील एक कुख्यात गुन्हेगार असून त्याला दोन वर्षांसाठी त्याला शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. संशयीत शहरात परतल्याची गुप्त माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यांनी तत्काळ ही माहिती गुन्हे शोध पथकाला दिल्यानंतर रात्री गस्तीवर असलेल्या गुन्हे शोध पथकातील अंमलदार रवींद्र साबळे, महेंद्र पाटील, दीपक गजरे यांनी पहाटेच्या सुमारास कांचननगर परिसरात अचानक धाड टाकून आरोपीच्या मुसक्या बांधल्या व त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तपास महिला पोलिस हवालदार भारती पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !