रेल्वे प्रवाशांना दिलासा : दिवाळी, छटपूजेसाठी दानापूर, नागपूर, गोरखपूरसाठी 570 विशेष गाड्यांच्या फेर्या

570 special trains to run to Danapur, Nagpur, Gorakhpur for Diwali, Chhath Puja भुसावळ (13 सप्टेंबर 2025) : प्रवाशांच्या वाढत्या गर्दीला तोंड देण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नवरात्रोत्सव, पूजा, दिवाळी आणि छठ या सणासुदीच्या काळात 570 विशेष गाड्यांच्या फेर्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत या गाड्यांची सेवा सुरू राहणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या प्रमुख शहरांतून उत्तर भारतातील गोरखपूर, दानापूर तसेच नागपूर-पुणे मार्गावर गाड्या सोडण्यात येणार आहेत.
उत्सवात प्रवाशांना दिलासा
नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी, छटपूजा यासाठी उत्तर भारतात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांना प्रवाशांची मोठीच गर्दी असते. ही गर्दी कमी व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्यांच्या फेर्या सुरू करण्यात येत आहे. यामुळे ऐन सण-वाराच्या दिवसात प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून विशेष फेर्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे अनेक प्रवासी याच गाड्यांचा आधार घेऊन प्रवास करतील यामुळे जागेचा प्रश्न प्रवाशांचा मार्गी लागणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, विशेष गाड्यांनी प्रवास करून जागेचा प्रश्न सुटणार आहे.

अशा होतील रेल्वे गाड्यांच्या फेर्या
मुंबई सीएसएमटी-गोरखपूर विशेष गाडीच्या फेर्या 132 होतील, या 26 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत दररोज सुटणार.
पुणे-गोरखपूर विशेष गाडीच्या फेर्या 130 होणार आहे, 27 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत दररोज सुटणार आहे.
नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष गाडीच्या 20 फेर्या होतील, 27 सप्टेंबर ते 29 नोव्हेंबरदरम्यान दर शनिवारी व रविवारी फेर्या असतील.
मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर दैनिक विशेष गाडीच्या 134 फेर्या होतील, 25 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान दररोज ही गाडी धावणार आहे.
मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडीच्या 20 फेर्या होतील, 25 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबरदरम्यान गुरुवार-शुक्रवार फेर्या होतील.
पुणे-दानापूर विशेष गाडीच्या 134 फेर्या होतील, 25 सप्टेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान दररोज गाडी धावणार आहे, या गाड्या भुसावळ, मनमाड, जळगाव, इटारसी, जबलपूर, प्रयागराज, कानपूर, लखनऊ, गोरखपूर, दानापूर यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहेत. प्रवाशांना वातानुकूलित, शयनयान, सामान्य द्वितीय तसेच आसन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
