भुसावळातील नाहाटा चौफुलीवर भीषण अपघात : शिरपूरातील तरुण ठार
क्रुझर वाहनचालकाविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल

Terrible accident on Nahata Chauphuli in Bhusawal: Youth from Shirpur killed भुसावळ (13 सप्टेंबर 2025) : भरधाव क्रुझरने दुचाकीला धडक दिल्याने या अपघातात शिरपूरातील 39 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. हा भीषण अपघात शहरातील नाहाटा चौफुली ओव्हरब्रिजवर झाला. मनोज अर्जुन पाटील (39) असे मृताचे नाव आहे. .या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अनोळखी क्रुझर वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले तरुणासोबत ?
बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान नाहाटा चौफुली ओव्हरब्रीजवर मनोज पाटील हे ज्युपिटर गाडीने जळगावकडे जात असतांना क्रुझर गाडीने (एम.एच.19 ए.एक्स.3109) वरील चालकाने निष्काळजीपणे व बेदरकारपणे वाहन चालवून मनोज पाटील यांच्या दुचाकीला धडक दिल्याने मनोज हे गंभीर झाले गंभीर जखमी जखमी झाले व पाटील यांचा दुसर्या दिवशी 18 ऑगस्टला उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मृताची पत्नी हर्षदा मनोज पाटील (31, रा.शिरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

अज्ञात क्रुझर चालकाचा कसून शोध
अपघातानंतर क्रुझर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांकडून वाहन चालकाचा शोध घेणे सुरू झाले आहे. मनोज पाटील हे शिरपूर येथे शैक्षणिक संस्थेत नोकरीस होते. पती गेल्याचा धक्का बसल्याने पाटील यांच्या पत्नीने 11 सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा अधिक तपास बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश चौधरी करत आहे.
