पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा : अमळनेर तालुक्यातील घटना

Five-month pregnant after underage marriage: Case of torture against husband अमळनेर (13 सप्टेंबर 2025) : मुलगी अल्पवयीन असतानाही तिचा विवाह लावल्यानंतर पतीने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याने पीडीता पाच महिन्याची गर्भवती राहिली. आशा वर्करच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अमळनेर तालुक्यातील भिलाली येथील पीडीतेच्या पतीविरुद्ध मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे नेमके प्रकरण
धुळे जिल्ह्यातील नरव्हाळ येथील आशा वर्कर नलिनी कैलास गवळी या कर्तव्यावर असताना गरोदर मातांची नोंदणी करीत होत्या. त्यावेळी भवानी नगरातील एका इसमाने सांगितले की, माझी मुलगी पाच महिन्यांची गरोदर आहे. तिची नोंदणी करून घ्या. आशा वर्करने तिच्यासह गरोदर महिलांना सिव्हिल हॉस्पिटल, धुळे येथे सर्वोपचार केंद्रात नेले. तिला डॉक्टरांनी तपासले असता ती 16 वर्षांची असल्याचे सांगितले. त्या मुलीला विचारपूस केली असता तिच्या आई-वडिलांनी तिचे लग्न एक वर्षांपूर्वी भिलाली, ता.अमळनेर येथील समाधान कैलास सोनवणे याच्याशी लावून दिल्याचेव त्यानंतर अल्पवयीन गर्भवती झाल्याचे सांगितले.