भुसावळातील बेपत्ता प्रौढाचा अमळनेरच्या तापी नदीपात्रात मृतदेह आढळला


Body of missing adult from Bhusawal found in Tapi riverbed in Amalner अमळनेर (13 सप्टेंबर 2025) : भुसावळ शहरातील गडकरी नगरातील न्यू राम मंदिराजवळील 48 वर्षीय प्रौढाचा अमळनेरच्या तापी नदीपात्रात मृतदेह गुरुवारी आढळला. धनंजय दत्तात्रय ढंगे उर्फ बबलू (48) असे मयताचे नाव आहे.

बेपत्ता प्रौढाचा मृतदेह आढळला
भुसावळातील धनंजय ढंगे हे रेल्वे परिसरातील कंटेनर यार्ड येथून सोमवार, 8 सप्टेंबर रोजी अचानक बेपत्ता झाले. त्यांच्या पत्नीच्या खबरीनंतर मंगळवार, 9 सप्टेंबर रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिसात बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली. त्याच दिवशी तापी नदी पुलावरून कुणीतरी उडी मारल्याची चर्चा अमळनेर शहरात होती.


मात्र नदीपात्रात प्रचंड पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने शोध मोहिमेत काहीही निष्पन्न झाले नव्हते. ढेंगे यांचा मित्रपरिवार व नातेवाईक अखंडपणे शोध घेत असताना गुरुवार, 11 सप्टेंबर रोजी अमळनेरजवळील तापी नदीपात्रात मासेमार्‍यांना एक पुरुषाचा मृतदेह सापडला. त्यांनी अमळनेर पोलिसांना तत्काळ माहिती दिली. त्यानंतर भुसावळ येथून ढेंगे यांचे मित्र तेथे पोहोचले असता मृतदेह धनंजय उर्फ बबलू ढेंगे यांचाच असल्याचे ओळख पटली.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !