महिलांनो मंगळसूत्र सांभाळा : पाणी पिण्याच्या बहाण्याने बहिलेचे सौभाग्याचे लेणे लांबवले

First, I drank water and in a moment, I stretched the mangalsutra around my neck. नाशिक (13 सप्टेंबर 2025) पाणी पिण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात शिरून चोरट्यांनी मंगळसूत्र चोरले. ही घटना नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील आदर्शनगर, रामवाडी भागात घडली.
काय आहे नेमका प्रकार
सायंकाळी पाच वाजताच्या सुमारासदोन अनोळखी इसमांनी घराजवळ येऊन पाण्याची मागणी केली. महिलेने सहज विश्वास ठेवून त्यांना पाणी दिल्यानंतर त्यापैकी एकाने थेट तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. महिलेच्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला व असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्याने तपासाला गती मिळाली आहे.

नंदिनी नायक असे या पीडित महिलेचे नाव असून त्या आदर्शनगर, रामवाडी येथील श्रद्धा पार्क सोसायटीत राहतात. नायक एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करतात. रोजच्या दिनक्रमाप्रमाणे त्या दळणाचा डबा घेऊन कामावरून संध्याकाळी घरी परतल्या. घरी आल्यानंतर त्यांनी पिशवी व डबा घरात ठेवला.
त्याच वेळी दोन अनोळखी इसम त्यांच्या घराजवळ आले आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने संभाषण सुरू केले. काही वेळानंतर त्यांनी नायक यांना पाणी मागितले. दयाळूपणाने नायक यांनी घरातून दोन ग्लास पाणी आणून दिले. पाणी पिल्यानंतर अचानक दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयितांचा चेहरा स्पष्ट दिसला
नायक यांनी धाडसाने प्रतिकार केला आणि चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींनी धक्काबुक्की करत बळजबरीने मंगळसूत्र हिसकावून घेतले. या झटापटीत मंगळसूत्राचा काही भाग नायक यांच्याकडे राहिला, तर उर्वरित भाग आरोपींनी हिसकावून पळ काढला. संपूर्ण प्रकार घडल्यावर नायक यांनी तत्काळ आपल्या मुलीला सर्व घटना सांगितली. त्यानंतर त्यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेऊन अधिकृत तक्रार दिली.
