साकेगावातील श्री स्वामीनारायण गुरुकुलमध्ये हिंदी दिवस उत्साहात


Hindi Diwas celebrated with enthusiasm at Shri Swaminarayan Gurukul in Sakegaon भुसावळ (13 सप्टेंबर 2025) : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील श्री स्वामीनारायण गुरुकुलमध्ये हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी गोपाळ भगत होते. मुख्याध्यापक मनोज भोसले, अभीष सरोदे, प्रणिता चौधरी उपस्थित होत्या.

हिंदी ही राष्ट्रभाषा-आपल्या अभिमानाचा गौरव या संकल्पनेने सजलेल्या कार्यक्रमाची सुरुवात मंगल प्रार्थना व दीपप्रज्वलनाने झाली. हिंदी भाषेचे महत्व स्पष्ट करणारे भाषण विद्यार्थी व हिंदीचे शिक्षक गुलशेर तडवी यांनी दिले. वक्तृत्वाच्या माध्यमातून हिंदीची समृद्ध परंपरा आणि संस्कृती उलगडून दाखविली. याप्रसंगी मुख्याध्यापक मनोज भोसले यांनी ापल्या भाषणात विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचा अभिमान बाळगण्याबद्दल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन गुलशेर तडवी यांनी केले.


कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये हिंदीबद्दल आदर, अभिमान ही भावना जागृत केली. संपूर्ण वातावरण हिंदी हमारे गर्व की पहचान या घोषवाक्यांनी दुमदुमून गेले. सर्व शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !