भुसावळात दे.ना.भोळे महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

रोटरी क्लब ऑफ भुसावळतर्फे कार्यक्रम उत्साहात


Teachers’ Day celebrated with enthusiasm at De.N.Bhole College in Bhusawal भुसावळ (13 सप्टेंबर 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात शिक्षक दिनाचा कार्यक्रम झाला. रोटरी क्लब ऑफ भुसावळतर्फे आयोजित या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ भुसावळतर्फे महाविद्यायाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांना स्मृतीचिन्ह, भेटवस्तू देत ‘उत्कृष्ट शैक्षणिक नेतृत्व’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

प्राध्यापकांचा सहृदय सन्मान
महाविद्यालयातील सर्व एकूण 30 प्राध्यापक-प्राध्यापिका यांचा गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ भुसावळचे सदस्य डॉ.माया आर्विकर यांना नुकताच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा ही विशेष सत्कार प्रसंगी करण्यात आला.


तर विकासाचे कार्यक्रम चांगल्या पद्धत्तीने नेता यतात
रोटरी क्लब ऑफ भुसावळचे अध्यक्ष रोटेरियन संजय चापोरकर यांनी रोटरी क्लब करीत असल्या सामाजिक कार्याची माहिती दिली आणि विविध समाजोपयोगी उपक्रम घेत असताना सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्थानी एकत्र आल्यास समाजापर्यंत विकासाचे कार्यक्रम अधिक चांगल्या पद्धतीने नेता येतात, असे विचार मांडले.

तहा महाविद्यालयाचा गौरव : प्राचार्य फालक
उत्कृष्ट शैक्षणिक नेतृत्व पुरस्कार प्राप्त प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी महाविद्यालयात सुरू असलेल्या शैक्षणिक, संशोधन आणि अध्यापनेतर कार्यक्रमांची माहिती दिली. हा पुरस्कार मला मिळालेला असता तरी तो आमच्या महाविद्यालयाचा गौरव असल्याचे ते म्हणाले. प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी संघ भावनेने कार्य केले तरच विकास साध्य होतो हे सांगून आमचे महाविद्याय सुरुवातीपासूनच परिवार म्हणून मार्गक्रमण करीत आहे. त्याने आम्ही नेहमीच विकास साध्य करीत असतो, असे मत व्यक्त करून सर्व रोटरी सदस्यांना कॉलेजची थोडक्यात माहिती दिली.

यांची होती उपस्थिती
सूत्रसंचालन रोटेरियन प्रा.डॉ.दयाघन राणे यांनी तर आभार प्रा.डॉ.अनिल सावळे यांनी मानले. रोटेरियन माजी सह प्रांतपाल रो.गजानन ठाकूर, रोटेरियन डॉ.नारायण आर्वीकर, रोटेरियन डॉ.माया आर्वीकर, रोटेरियन मदन बोरकर, रोटेरियन प्रा.डॉ.दयाघन राणे, रोटेरियन गजानन सेवलकर व रोटेरियन अशोक निकम उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रकाश सावळे, सुधाकर चौधरी, सुनील ठोसर यांनी परिश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !