भुसावळच्या तरुणाला धुळ्यात लुटले : अजनाडच्या दोघांना बेड्या


A youth from Bhusawal was robbed in Dhule : Two from Ajnad were handcuffed धुळे (16 सप्टेंबर 2025) : सोशल मिडीयावरील व्हिडिओ पाहून भुसावळातील तरुण पैसे पाच पट करण्याच्या आमिषाने धुळे तालुक्यातील कुसूंब्यात पोहोचले मात्र त्यावेळी आरोपींनी चाकूचा धाक दाखवत मारहाण करीत तरुणाकडील 80 हजार रुपये लूटले. धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अजनाड, ता.धुळे येथील दोघांना लाखाच्या मुद्देमालासह अटक केली आहे. रेवलाल पवार आणि जगराज भोसले (दोघे रा.अजनाळे, ता.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

काय घडले भुसावळच्या तरुणासोबत ?
सौरभ जव्हेरीलाल कोटेचा (30, रा.मुसावळ, जि. जळगाव) या तरुणाने सोशल पीडियावर एक व्हिडीओ पाहिला. त्यात लाखाला पाच लाख आणि दोन लाखाला दहा लाख रुपये देण्याचे आमिष दाखवण्यात आले व या आमिषाला बळी पडून सौरभ याने संशयिताशी संपर्क साधला.

धुळे तालुका पोलिसात गुन्हा
आरोपींनी त्याला पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी कुसुंबा गावाबाहेर, उड्डाणपुलाखाली मालेगाव रोडवर एका निर्जन ठिकाणी बोलावले. 12 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता सौरभ ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. तिथे रेवलाल पवार आणि जगराज भोसले (दोघे रा. अजनाळे, ता. धुळे) हे दोघे आरोपी उपस्थित होते. त्यांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत सौरभकडील 40 हजार रुपये हिसकावून घेतले. यावेळी सौरभने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

दोघांना ठोकल्या बेड्या
धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने अजनाळे गावातील आरोपी रेवलाल पवार (45) व जगराज किरसिंग भोसले (39) या दोघांच्या मुसक्या आवळल्या. गुन्ह्यातील दुचाकीसह 40 हजारांची रोकड मिळून एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !