मोहाडी पोलिसांची मोठी कामगिरी : चोरीच्या चार दुचाकींसह मालेगावातील चोरट्याला बेड्या


Big achievement by Mohadi police : Thief from Malegaon arrested with four stolen bikes धुळे (16 सप्टेंबर 2025) : मोहाडी पोलिसांनी दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान मालेगावातील चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून धुळ्यातून लांबवलेल्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तोहिद ऊर्फ भुर्‍या अहमद एजाज अहमद (30, हारूण अन्सारी नासरा मुबारक मशिदीजवळ, 80 फूटी रोड, मालेगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

सीसीटीव्हीद्वारे गवसला आरोपी
धुळ्यातील अवधान एमआयडीसतील उज्वल ऑटो मोबाईल येथील समोरील पार्कींग यार्डमधील होंडा कंपनीची सी. बी. शाईन दुचाकी चोरीला गेली होती व याबाबत मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल होता. सीसीटीव्हीमध्ये आरोपी दुचाकी चोरी केल्याने त्याची छबी कैद झाली होती तर मोहाडी निरीक्षक शिल्पा पाटील यांना एक संशयीत लळींग घाटात विना क्रमांकाच्या दुचाकीवर फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास ताब्यात घेण्याचे निर्देश देण्यात आले व चौकशीत आरोपीने दुचाकी चोरीची कबुली देत त्यान अवधानसह धुळे शहरातून चार दुचाकी चोरी केल्याीच कबुली दिली. जप्त दुचाकींमध्ये दोन हिरो होंडा शाईन, एच.एफ.डिलक्स व होंडा कंपनीची युनिकॉर्न आदी गाड्यांचा समावेश आहे.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील, हवालदार सचिन वाघ, हवालदार गणेश बोरसे, हवालदार राहुल पाटील, कॉन्स्टेबल चेतन झोळेकर, कॉन्स्टेबल जितेंद्र सैंदाणे, कॉन्स्टेबल रमेश शिंदे, कॉन्स्टेबल सुमित चव्हाण आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !