आयुष कोमकर हत्या प्रकरणात कृष्णा आंदेकरच मास्टर माईंड
Krishna Andekar is the mastermind in the Ayush Komkar murder case पुणे (17 सप्टेंबर 2025) पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीच्या मुसक्या बांधल्या आहेत. मालमत्ता आणि पैशांच्या वादातून आयुषचा खून झाला असून त्यात कृष्णा आंदेकरची मुख्य भूमिका आहे, असा दावा पोलिसांकडून कोर्टात करण्यात आला. यावेळी कोर्टात सरकारी वकिलांनी धक्कादायक माहिती दिली.
कृष्णा हा मारेकरी आणि कट रचणार्या आरोपींमधील प्रमुख ‘लिंक’ असल्याचा दावाही तपास अधिकार्यांनी केल्याने सध्या खळबळ उडाली आहे. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल कृष्णाने दिले असल्याची कबुली अमन पठाण व सुजल मेरगू यांनी दिली आहे. कृष्णाने पिस्तूल कोठून आणलं, फरारी असताना तो कोणाच्या संपर्कात होता आदी मुद्यांवर तपास करायचा आहे.





