स्वतःच्या मृत्यूचा रचला बनाव : भाजपा नेत्याच्या मुलाचा प्रताप कॉल डिटेल्सनंतर उघड !

Faked his own death: BJP leader’s son Pratap’s call details revealed! छत्रपती संभाजीनगर (19 सप्टेंबर 2025) : दिड कोटीहून अधिक कर्ज झाल्यानंतर भाजपा नेत्याच्या दिवट्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. त्यासाठी कारच पाण्यात बुडवली मात्र त्यात मृतदेह नसल्याने पोलिसांनी तपास सुरू केला व कॉल्स डिटेल्समध्ये नंबर महाराष्ट्रात अॅक्टीव्ह असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी मृत्यूचे नाटक रचणार्या दिवट्याला ताब्यात घैतले.
काय आहे नेमके प्रकरण ?
5 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पोलिसांना मध्य प्रदेशातील कालीसिंध नदीत एक कार बुडाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कार बाहेर काढली, पण आत कोणीही नव्हते. ती कार विशाल सोनीची असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. त्यानंतर, 10 दिवस त्याचा मृतदेह शोधण्यासाठी व्यापक मोहीम राबवण्यात आली. या शोधमोहिमेत अनेक पथकांनी 20 किलोमीटरच्या परिसरात शोध घेतला.
कॉल डिटेल्सवरून लावला छडा
अनेक दिवस शोध घेऊनही विशालचा थांगपत्ता न लागल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी विशालच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले असता, त्याचे लोकेशन महाराष्ट्रात असल्याचे उघड झाले. तातडीने महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर येथे त्याला अटक करण्यात आली.
कर्ज फेडण्यासाठी रचला कट
पोलिसांनी चौकशी केली असता विशालने धक्कादायक खुलासा केला. त्याच्यावर एक कोटी 40 लाखांपेक्षा जास्त रुपयांचे कर्ज होते. कर्ज फेडता येत नसल्यामुळे कुटुंबाच्या सल्ल्यानुसार, त्याने स्वतःच्या अपघाती मृत्यूचा बनाव रचला. मृत्यू पश्चात मिळणार्या प्रमाणपत्रामुळे बँकेचे कर्ज माफ होईल, असा त्याच्या कुटुंबीयांचा समज होता.
