पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेवर वारंवार अत्याचार !


Repeated assault on a woman living separately from her husband ! चांदूर रेल्वे (22 सप्टेंबर 2025) : लिव्ह इनमध्ये राहणार्‍या 28 वर्षीय महिलेचे सलग चार वर्ष शारीरीक शोषण करण्यात आले. पीडीतेने तक्रार दिल्यानंतर दोघांविरोधात बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर एकाला अटक करण्यात आली.

काय घडले महिलेसोबत ?
28 वर्षीय महिला पतीपासून विभक्त राहते. आरोपी सौरभ विश्वासराव शिंगाडे याच्याशी ओळख झाल्यानंतर त्यांच्या प्रेम संबंध निर्माण झाले व 2021 ते 2025 या काळात अनेकवेळा त्याने लग्नाच्या आमिषाने अत्याचार केला. लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिला. 27 नोव्हेंबर 2021 ते 14 सप्टेंबर 2025 या दरम्यान ती लैंगिक अत्याचाराची घटना घडली.






चांदूर रेल्वे पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी सौरभ विश्वासराव शिंगाडे (26) व योगेश विश्वासराव शिंगाडे (28, दोघेही रा. सुलतानपूर, ता. नांदगाव खंडेश्वर) यांच्याविरुद्ध बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल केला.

बलात्काराचा आरोप असलेल्या सौरभ शिंगाडे याला 19 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. एफआयआरनुसार नोव्हेंबर 2021 मध्ये फिर्यादी महिलेची सौरभ शिंगाडे याचे सोबत ओळख झाली व पुढे त्यांच्या प्रेमसंबंधदेखील जुळले.

दरम्यान फिर्यादी ही तिच्या पतीपासून विभक्त राहत असल्याने सौरभ याने तिला लग्नाचे आश्वासन दिले. तथा तिच्याशी वारंवार शारीरिक बळजबरीदेखील केली. विशेष म्हणजे ते ‘लिव इन रिलेशनशिप’मध्ये सोबतदेखील राहत होते.

रविवार, 14 सप्टेंबर रोजी आरोपी सौरभ हा पीडितेला काहीही न सांगता निघून गेला. त्यामुळे पीडिताने भावासह आरोपी सौरभचे सुलतानपूर येथील घर गाठले. त्यावेळी तिथे सौरभ व योगेश या दोघांनी तिच्याशी वाद घातला.

आपण चांदुर रेल्वे येथे जाऊन बोलू असे त्याने बजावले. चांदूर रेल्वे येथे परतल्यानंतर त्याने आता मला तुझ्यासोबत राहायचे नाही, लग्नदेखील करायचे नाही, असे बजावले. त्यावर फिर्यादीने त्याला लग्न न करण्याचे कारण विचारले. याचवेळी सौरभने तिला शिवीगाळ केली तर योगेश याने तिच्या गालावर थापड मारली.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !