मोराणे जि.प.शाळेतून टीव्ही लांबवला : आरोपी धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

TV thieves arrested by Dhule Crime Branch धुळे (23 सप्टेंबर 2025) : धुळे तालुक्यातील मोराणे गावातील जिल्हा परिषद शाळेचे कुलूप तोडून चोरट्यांनी विद्यार्थ्यांसाठी असलेला महागडा टीव्ही लांबवला होता. धुळे तालुका पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेने गावातील दोन आरोपींना अटक करीत त्यांच्याकडून चोरी केलेला टीव्ही जप्त केला आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
मोराणे गावातील जिल्हा परिषद शाळेचे कुलूप तोडून चोरट्यांनी 19 हजार 200 रुपये किंमतीचा ओनिडा कंपनीचा टीव्ही लांबवला होता. 19 मे रोजी ही घटना घडल्यानंतर धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही चोरी गावातील संशयीत योगेश राजेंद्र माळे (32) व पियुष नामदेव पारधी (19, दोन्ही रा.मोराणे प्र.ल., जि.धुळे) यांनी केल्यानंतर पथकाने त्यांना अटक करीत त्यांच्याकडून चोरी केलेला टीव्ही जप्त केला.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमित माळी, अंमलदार हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली.
