धुळे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : चोरीच्या दहा दुचाकींसह आरोपी जाळ्यात


Dhule Crime Branch takes major action : Accused nabbed along with ten stolen bikes धुळे (25 सप्टेंबर 2025) : धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे अट्टल दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून तीन लाख 70 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यातील दोन दुचाकी शिंदखेडा हद्दीतून तर एक दुचाकी चांदवड हद्दीतून चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे तर उर्वरीत सात वाहनांबाबत चेचीस व इंजिन क्रमांकाच्या आधारे ओळख पटवली जात आहे.

या आरोपींना अटक
मुकेश संजय पवार (24, डाबरी घरकुल दोंडाईचा, ता.शिंदखेडा) या संशयीताला अक करण्यात आली असून एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे तर आरोपींचा साथीदार अजय उर्फ आकाश विजय भील (निरगुडी, ता.शिंदखेडा) हा मात्र पसार झाला आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, हवालदार संतोष हिरे, प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, सचिन गोमसाळे, सुरेश भालेराव, राहुल गिरी, कमलेश सुर्यवंशी, विनायक खैरनार व हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !