धुळ्यात 20 लाखांचा गुंगीकारक अंमली पदार्थांचा साठा नष्ट


Drug cache worth Rs 20 lakh destroyed in Dhule धुळे (25 सप्टेंबर 2025) : धुळ्यात मानवी आरोग्याला नशा येणार्‍या गांजासह अफूची बोंडे तसेच गुंगीकारक औषधांचा सुमारे 20 लाखांचा साठा न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला.

धुळे जिल्हा पोलिसांनी विविध कारवायांमध्ये अफूची बोंडे, गांजा तसेच मानवी आरोग्याला नशा येणारा गुंगीकारक औषधांचा साठा जप्त केला होता. तब्बल 12 गुन्ह्यातील या साठ्याची किंमत 19 लाख 57 हजार 640 इतकी असून अधिकार्‍यांच्या उपस्थितीत हा साठा मुख्यालयाच्या आवारात खड्डा खोदून नष्ट करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
प्रादेशिक अंमली पदार्थ नाश समिती अध्यक्ष तथा धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती ठाकरे, धुळे तहसीलदार अरुण शेवाळे, पोलिस उपअधीक्षक विश्वजीत जाधव, न्याय वैद्यक प्रयोग शाळेचे सहा.संचालक अतुल पाटील यांच्या उपस्थितीत गुन्ह्याच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.

यावेळी गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, सा.बां.विभागाचे हर्षद श्रीपाद जोशी व भाऊसाहेब सर्जेराव गायकवाड तसेच पोलिस निरीक्षक निवृत्त पवार, धुळे तालुका पोलिस निरीक्षक धनंजय पाटील, शिंदखेडा सहाय्यक निरीक्षक हनुमंत गायकवाड, नरडाणा एपीआय निलेश मोरे, गुन्हे शाखेचे एपीआय श्रीकृष्ण पारधी, सतीश जाधव, हवालदार मायुस सोनवणे, हवालददार संदीप पाटील, नितीन दिवसे, मयूर पाटील आदींची उपस्थिती होती.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !