रामानंद पोलिसांची मोठी कारवाई : अट्टल घरफोड्यांच्या चौकडीकडून 35 लाखांच्या ऐवज जप्त ; तीन गुन्हे उघड

Ramanand police take major action: Property worth Rs 35 lakh seized from Attal house burglary quartet ; Three crimes uncovered जळगाव (26 सप्टेंबर 2025) : रामानंद नगर पोलिसांनी गस्तीदरम्यान कुख्यात चोरट्यांच्या चौकडीला बेड्या ठोकल्यानंतर त्यांनी तीन घरफोड्या केल्याची कबुली देत तब्बल 35 लाखांचा मुद्देमाल काढून दिला आहे. पोलिसांच्या या कारवाईचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कौतुक करीत कारवाईची माहिती शुक्रवारी माध्यमांना दिली. अटकेतील आरोपींकडून 310 ग्रॅम सोने आणि 250 ग्रॅम चांदीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या आरोपींना अटक
रवी प्रकाश चव्हाण (21, रा.तांबापूरा), शेख शकील शेख रफीक (30, रा.मौलवीगंज, धुळे, ह.मु.सालार नगर, जळगाव), जुनेद उर्फ मुस्तकीन भिकन शहा (मच्छीबाजार, तांबापुरा, ह.मु.मशीदीजवळ, शिरसोली, जि.जळगाव), गुरुदयालसिंग मनजीत टाक (शिरसोली नाका, तांबापुरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
संशयीत गवसताच आवळल्या मुसक्या
रामानंद नगर सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्यासह पथक शुक्रवार, 19 सप्टेंबर रोजी रात्र गस्तीवर असताना दोन इसम संशयीतरित्या फिरताना आढळले. पाठलाग करून त्यांना पकडण्यात आल्यानंतर त्यांनी मोहाडी रोड येथील घरफोडीची कबुली दिल्याने त्यांना 19 रोजी अटक करण्यात आली तर चौकशीत त्यांनी अन्य दोन साथीदारांची नावे सांगितल्याने त्यांना 20 रोजी अटक करण्यात आली.
35 लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींनी रामानंद हद्दीत दोन घरफोड्या तसेच एक दुचाकी चोरीची कबुली दिल्यानंतर तीन गुन्ह्यांची उकल झाली तर आरोपींनी चोरी केलेला मुद्देमाल सुरतसह जामनेरात विकल्याची कबुली दिल्यानंतर सराफांकडून तब्बल 310 ग्रॅम सोने आणि 250 ग्रॅम चांदीची लगड जप्त करण्यात आली.
36 लाखांची घरफोडी उघड
1 जून रोजी मोहाडी रोड भागातील लिलाधर खंबायत यांचे साडू नरेंद्र वाघ हे परदेश दौर्यावर असताना घर बंद असल्याची संधी साधून 15 मे ते 1 जून या कालावधीत चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश करीत 357 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 250 ग्रॅम वजनाची चांदीची भांडी व दागिने आणि 85 हजार रुपये रोख रक्कम तसेच डीव्हीआर, वायफाय मॉडेल असा एकूण 36 लाख 83 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबवला होता. आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यातील मुद्देमाल मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आला आहे.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शाखाली रामानंद निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सहा.निरीक्षक भूषण कोते, पोलिस हवालदार जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, सुधाकर अंभोरे, योगेश बारी, विनोद सूर्यवंशी, अतुल चौधरी, रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, अनिल सोननी, नितेश बच्छाव, गोविंदा पाटील, दीपक वंजारी, चालक प्रमोद पाटील आदींनी आरोपींच्या मुसक्या बांधल्या.
