अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी : 40 प्रेक्षकांचा मृत्यू

Stampede at actor Vijay’s rally: 40 spectators die करूर, तामिळनाडू (29 सप्टेंबर 2025) : अभिनेता विजयच्या करूर रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 40 प्रेक्षकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 16 महिला आणि 10 मुलांचा समावेश असून 95 जण जखमी झाले आहेत. यापैकी 51 जण आयसीयूमध्ये आहेत.
हा तर गुन्हेगारी कट
विजयच्या पक्षाने, तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) ने मद्रास उच्च न्यायालयात कट रचल्याचा आरोप करणारी याचिका दाखल केली आहे. आज दुपारी 2:15 वाजता त्यावर सुनावणी होण्याची अपेक्षा आहे. टीव्हीकेचे वकील अरिवझगन म्हणाले, हा अपघात एक गुन्हेगारी कट होता. आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे की या प्रकरणाची चौकशी राज्य यंत्रणेकडून करू नये. तपास विशेष तपास पथक (एसआयटी) किंवा सीबीआयकडे सोपवावा. आमच्याकडे स्थानिक रहिवाशांकडून ठोस माहिती आणि काही सीसीटीव्ही फुटेज आहेत. यावरून स्पष्ट होते की हे काही द्रमुक नेत्यांचे कट होते.
30 हजारांहून अधिक प्रेक्षकांची गर्दी
खरं तर, अभिनेता विजयने 2 फेब्रुवारी 2024 रोजी टीव्हीकेची स्थापना केली. त्याने 2026 च्या विधानसभा निवडणुका लढवण्याचा आपला इरादा जाहीर केला. परिणामी, तो राज्यभर रॅली काढत आहे. यासाठी करूरमध्येही एक रॅली काढण्यात आली. 10,000 लोकांसाठी परवानगी देण्यात आली होती, परंतु 30,000 हून अधिक लोक जमले होते.
या कारणांमुळे दुर्घटना
अभिनेता विजय नियोजित वेळेपेक्षा सुमारे 6 तास उशिरा करूरला पोहोचला, त्यामुळे त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली शिवाय संध्याकाळी 7.45 च्या सुमारास काही लोक विजयच्या बसकडे जाऊ लागले, ज्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. धडकेत आणि उष्णतेमुळे अनेक लोक बेशुद्ध पडले आणि गर्दीमुळे श्वसनाचा त्रास होऊ लागला. चेंगराचेंगरीत अनेक मुले त्यांच्या कुटुंबांपासून वेगळी झाली, अनेक मुले गर्दीत चिरडली गेली, लोक त्यांना चिरडत राहिले. विजयच्या स्टेजजवळ वाढत्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिस किंवा स्वयंसेवक उपस्थित नव्हते. परिणामी, गर्दी अनियंत्रित झाली. प्रशासनाला 30 हजार लोकांची उपस्थिती अपेक्षित होती, परंतु 50 हजारहून अधिक लोक आले. इतक्या मोठ्या गर्दीला हाताळण्यासाठी व्यवस्था नव्हती.
तामिळनाडू सरकारने चौकशी आयोग स्थापन केला
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी अपघाताची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती अरुणा जगदीसन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला. स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये, तर जखमींना एक लाख रुपये देण्याची घोषणा केली. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सीएम स्टॅलिन रात्री उशिरा करूर येथे पोहोचले.
