सायबर चोरट्यांचा व्यावसायीकाला एक कोटींचा गंडा : शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष


Cyber ​​thieves dupe businessman of Rs 1 crore : lured him with investment in the stock market पुणे (1 ऑक्टोबर 2025) : शेअर बाजार हा जोखमीचा असल्याने त्यात गुंतवणूक करताना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांसह सेबीकडून वारंवार केले जाते व या शेअर बाजारात अधिक परतावा मिळेल, असे सांगून सायबर टोळ्या फसवणुकीचे प्रकार देशभरात करताल. पुण्यातील व्यावसायीकाचीदेखील अशाच पद्धत्तीने 97 लाखात फसवणूक करण्यात आली. शिवाजीनगर सायबर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले व्यावसायीकासोबत ?
कर्वेनगर येथील या व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर संदेश पाठवून संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखवण्यात आले. त्यानंतर, चोरट्यांनी त्यांना समाज माध्यमातील एका ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले आणि शेअर बाजारातील विविध योजनांची माहिती दिली.

सुरुवातीला व्यावसायिकाने थोडी रक्कम गुंतवली. चोरट्यांनी त्यांना गुंतवणुकीवर परतावा मिळाल्याचे भासवले मात्र प्रत्यक्षात त्यांना कोणताही परतावा मिळाला नव्हता. हा परतावा समाज माध्यमातील ग्रुपमध्ये दिसल्याने व्यावसायिकाचा विश्वास बसला.

यामुळे विश्वास बसलेल्या व्यावसायिकाला चोरट्यांनी शेअर बाजारात आणखी रक्कम गुंतवण्यास सांगितले. गेल्या पाच ते सहा महिन्यांत व्यावसायिकाने वेळोवेळी 97 लाख 50 हजार रुपये गुंतवले. मात्र, यानंतर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही.

जेव्हा व्यावसायिकांनी चोरट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !