विमानाने दिल्ली गाठून महागड्या कारची चोरी : 83 लाखांची पाच वाहने जप्त


Expensive cars stolen after reaching Delhi by plane: Five vehicles worth Rs 83 lakh seized सोलापूर (3 ऑक्टोबर 2025) : विमानाने थेट दिल्ली जावून कार चोरी करणार्‍या हा प्रोफाईल चोरट्यांना सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींकडून पाच महागड्या कार जप्त करण्यात आल्या असून दिल्लीतील पाच गुन्ह्यांचा उलगडा केला आहे.

बनावट रजिस्ट्रेशनद्वारा वाहनांची विक्री
संशयीत दिल्लीला विमानाने जाऊन तेथील हाफिज (रा. मेरठ) व लखविंदर सिंह (रा. रायपूर) यांच्याकडून चोरीच्या गाड्या महाराष्ट्रात आणत होते. त्यानंतर गाड्यांचे मूळ इंजिन व चेसी नंबर काढून बनावट नंबर बसवून व खोटे आरटीओ रजिस्ट्रेशन तयार करून विक्री करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पथकाने पाच आलिशान कार, मोबाइल हँडसेट असा 83 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपींवर यापूर्वी सातारा, सांगली, पिंपरी-चिंचवडसह दिल्ली, मध्य प्रदेश व कर्नाटकातील अनेक पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत.

असे अडकले आरोपी जाळ्यात
मुळेगाव तांड्याशेजारी संशयास्पदरीत्या उभी असलेली पांढरी आलिशान कार पाहून पथकाने चौकशी केली असता वाहनातील चार व्यक्तींकडे कागदपत्रे नव्हती. वाहनाची झडती घेतली असता, त्यावरील चेसीस व इंजिन नंबर बदलून बनावट प्रिंट बसवलेले आढळले.

अजीम सलीमखान पठाण (36, रा.रहिमतपूर, सातारा), प्रमोद सुनील वायदंडे (26, रा.धामनेर स्टेशन, सातारा), फिरोज शिराज मोहम्मद (35, रा.आर.टी.नगर, बंगळुरू), इरशाद सफिउल्ला सय्यद (रा.कोलार, कर्नाटक) यांना अटक करण्यात आली.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !