पाडळसे लोेकनियुक्त सरपंचांना आयुक्तांकडून दिलासा : जिल्हाधिकार्‍यांचा अपात्रतेचा आदेश रद्द


Relief from the Commissioner to the Sarpanchs appointed by the Padalse Lok: The District Collector’s disqualification order has been cancelled. यावल (5 ऑक्टोबर 2025) : यावल तालुक्यातील परसाडे बुद्रुक येथील लोकनियुक्त सरपंच मीना राजू तडवी यांच्या विरोधात तक्रारदार छब्बीर कान्हा तडवी यांनी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे अतिक्रमणाबाबत तक्रार दाखल केली होती. यात जिल्हाधिकारी यांनी तडवी त्यांना अपात्र घोषित केले होते. या निर्णया विरोधात सरपंच तडवी यांनी अपर आयुक्त, नाशिक यांच्याकडे अपिल दाखल केले होते. अपर आयुक्त निलेश सागर यांच्या दालनात सुनावणी होऊन त्यांनी जिल्हाधिकारी, जळगाव यांचा आदेश रद्द केला

सरपंच तडवी यांच्या बाजूने अँडव्होकेट जी.एम.पाटील(मनवेलकर) यांनी पाहिले.

हा तर सत्याचा विजय :सरपंच
नवरात्र उत्सवात आलेला हा निकाल खर्‍या अर्थाने सत्याचा व नारी शक्तीचा विजय आहे. परसाडे गावच्या जनतेचे मी विशेष आभार मानू इच्छिते कारण त्यांच्या आशिर्वादामुळेच हे शक्य झाले आहे. निवडणुकीत लढत देऊन विजय मिळवणे हाच मोठा विजय असतो. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात कोणाचे स्थान ? आहे हे स्पष्ट होते, असे मीना तडवी म्हणाल्या.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !