जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चे माजी व्यवस्थापकीय संचालक सुनील देशपांडे यांचे देहावसान


जळगाव (7 ऑक्टोबर 2025) : जैन इरिगेशनच्या जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चे माजी व्यवस्थापकीय संचालक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावलेले सुनील शंकरराव देशपांडे (65) यांचे 6 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते अनुभूती निवासी स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम केलेल्या पूजा देशपांडे यांचे पती होते.

मुंबईत झाले निधन
5 ऑक्टोबर रोजी अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावली व त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व कन्या डॉ.सृष्टी, जावई असा परिवार आहे.

जैन फार्म फ्रेश फूड्स लिमिटेड जैन फूड पार्क येथे मार्च 2004 ला ते सिनियर व्हाईस प्रेसिडेंट या पदावर रुजू झाले होते. 30 मे 2016 मध्ये त्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. ते 2021 पर्यंत कंपनीत कार्यरत होते. देशपांडे यांनी अनेक नवकल्पना राबवून फळ व भाजीपाला प्रक्रिया क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले होते. सहकार्‍यांमध्ये ते शांत, संयमी आणि मदतीस तत्पर असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने देशपांडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !