धक्कादायक !  : सोन्यासाठी जळगावात स्मशानभूमीतून चक्क अस्थीच लांबवल्या


Shocking! : Bones were taken from a cemetery in Jalgaon for gold जळगाव (8 ऑक्टोबर 2025) : जळगाव स्मशानभूमीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. मृतदेहाच्या अंगावरील सोन्यासाठी अस्थीच लांबवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

छबाबाई काशिनाथ पाटील यांचे रविवार, 5 ऑक्टोबर निधन झाले होते आणि सहा ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल. त्यानंतर तिसर्‍या दिवशी मंगळवारी त्यांच्या कुटुंबीयांनी अस्थी संकलनासाठी स्मशानभूमीत भेट दिल्यानंतर अस्थी गायब असल्याचे लक्षात आले.

कुटुंबीयांचा संशय आहे की, प्रेताच्या अंगावरील सोन्यासाठी चोरट्यांनी अस्थी चोरून नेल्या असाव्यात. या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांनी जळगाव महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. स्मशानभूमीत ना सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, ना सुरक्षारक्षक – त्यामुळेच अशा घटनांना आमंत्रण मिळाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार सुरेश भोळे हेही घटनास्थळी दाखल झाले. आमच्या भावनांशी खेळ झाला आहे, अशी भावना पाटील कुटुंबीयांनी व्यक्त केली.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !