बदलापूरातील अक्षय शिंदेचा एन्काउंटर प्रकरणात पोलिसांना मिळाला न्यायालयातून मिळाला दिलासा ; काय घडले ?


Police got relief from the court in the encounter case of Akshay Shinde in Badlapur; What happened? मुंबई (8 ऑक्टोबर 2025) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या बदलापूरच्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला होता. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले होते तर विरोधकांनी हे एन्काउंटर फेक असल्याचा दावा केला होता मात्र न्यायालयाने आरोपीचं एनकाऊंटर करणार्‍या पोलिसांना निर्दोषत्व बहाल केले आहे. न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना क्लीनचीट देण्यात आली.

पोलिसांना मोठा दिलासा
स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा न्या. दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाने मान्य केला मात्र आरोपीला व्हॅनमधून नेण्याच्या प्रक्रियेवर आयोगाकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. राज्य मानवाधिकार आयोगाकडूनही पोलिसांना यापूर्वीच क्लीन चीट मिळाली आहे. त्यात आता न्या.दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगानेही पोलिसांना क्लीनचीट दिल्याने पोलिसांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.

मानवाधिकार आयोगाकडून यापूर्वीच क्लीन चीट
न्या.दिलीप भोसले आयोगाकडून पोलिसांना क्लीन चीट देण्यात आली आहे. अक्षय शिंदेंच्या कुटुंबीयांची तक्रार नसल्यानं मानवाधिकार आयोगाची या आधीच पोलिसांना क्लीन चीट मिळाली मात्र मुंबई हायकोर्टाकडून मात्र एसआयटी स्थापन करुन चौकशीचे आदेश देण्यात आले होते. कोर्टाने नव्हे तर डीजीपींने एसआयटी स्थापन करावी, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश होते. अशातच आता आरोपीचं एनकाऊंटर करणार्‍या पोलिसांना न्या.दिलीप भोसले आयोगाकडून निर्दोषत्व बहाल करण्यात आलं आहे.

दोघा अल्पवयीनांवर नराधमाचा अत्याचार
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शाळेतील सफाई क्रमाचारी अक्षय शिंदे याने शाळेतील दोन अल्पवयीनांवर अत्याचार केला होता. 23 सप्टेंबर 2024 रोजी तळोजा तुरुंगात जात असताना पोलिस चकमकीत अक्षय शिंदेंचा मृत्यू झाला होता. हा एन्काउंटर फेक असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळं या प्रकरणाचा तपास एसआयटी स्थापन ककरण्यात आली व जबाबदार पोलिस अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !