नाशिक पुन्हा खुनांनी हादरले : सेवानिवृत्त महिला अधिकार्‍याची मुलाने केली हत्या


Nashik shaken by murders again : Retired female officer murdered by her son नाशिक (8 ऑक्टोबर 2025) : सेवानिवृत्त महिला अधिकार्‍याची मुलानेच निर्घण हत्या केली. सोमवारी पहाटे ही घटना घडली. मंगला घोलप असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मयत महिला या सेवानिवृत्त विस्तार अधिकारी आहेत.

मंगला घोलप यांची त्यांचा मुलगा स्वप्निल घोलप यानेच धारदार शस्त्राने हत्या केली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून स्वप्निल घोलप याला ताब्यात घेतले.

स्वप्निलने त्याच्या आईची हत्या का केली, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोललिस स्वप्निलची चौकशी करत आहेत. दरम्यान, मुलानेच आईची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

गेल्या काही वर्षात नाशिकमधील गुन्हेगारी वाढली असून मागील नऊ महिन्यात नाशिकमध्ये झालेली 45 वी हत्या आहे त्यामुळे पोलिसांसमोर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !